'मोहनदास' नाही 'मोहनलाल करमचंद गांधी' असं म्हणाले मोदी : सर्वत्र टीका

बिहार : पंतप्रधान नारद मोदी मंगळवारी बिहारच्या मोतिहारी येथे होते. चंपारण सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी येथे आले आहेत, दरम्यान उपस्थित लोकांना संबोधित करताना एक खूप मोठी चूक झाली आहे.
बिहार मधील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींचा उल्लेख करताना त्यांच्या नावातच घोळ घातला. सभे दरम्यान मोदी म्हणाले ‘मोहनलाल करमचंद गांधी’ आणि देशभर चर्चा आणि टीका होत आहे. मोदी म्हणाले, ”बिहारने मोहनलाल करमचंद गांधी यांना महात्मा बनवलं, त्यांना बापू बनवलं”. परंतु महात्मा गांधींच संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं आहे, परंतु मोदी ‘मोहनलाल करमचंद गांधी’ असं म्हणाले आहेत.
काँग्रेसने सुद्धा मोदींवर जोरदार टीका करत चिमटा काढला आहे की, देशात ५ वर्षाच्या लहान मुलाला सुद्धा गांधीजींचं नाव माहित आहे. मोदींच्या तो भाषणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. मोदींच्या या चुकीमुळे त्यांच्यावर समाज माध्यमातून जोरदार टीका होत आहे. एक यूजर ने म्हटलं आहे कि, राष्ट्रपिताचं नाव माहीत नसलेले नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, की त्यांनी असं जाणूनबुजून केलं असा प्रतिप्रश्न सुद्धा केला आहे. पाच वर्षाच्या लहान चिमुकल्यालासुद्धा माहिती आहे की गांधीजींचं नाव मोहनदास करमचंद गांधी होतं’. गौरव यांच्या ट्विटनंतर लोकांनी पीएम मोदींची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली.
एका यूजरने तर थेट त्यांच्या शिक्षणावरच उडी घेतली आहे, त्यात नितीन सिन्हा नामक यूजरने ’महात्मा गांधींचं पूर्ण नाव माहिती नसणं हा शिक्षणाचा फरक आहे. नथुरामचं नाव विचारलं तर संपूर्ण खानदानाचं नाव सांगतील हे लोकं’ असा खोचक टोला ट्विटर वर लगावला आहे.
काय म्हणाले मोदी नेमकं त्याचा व्हिडीओ;
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं