शिवसेना नेत्याच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा म्हटलं म्हणून कारवाई?- संजय निरुपम

मुंबई, १६ जुलै : राजस्थानमधील काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांचीही पक्षातून हकालपट्टी होण्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मी फक्त शिवसेनेवर टीका केली. त्याचा पक्षविरोधी कारवाईशी संबंध काय?, असं सांगतानाच मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का? असा सवाल संजय निरुपम यांनी केला आहे.
संजय निरुपम यांनी ट्विट करून त्यांच्यावर होणाऱ्या संभाव्य कारवाईवर परखड मत व्यक्त केलं आहे. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी हायकमांडकडे केल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्र्यांशी संबंधित भूखंड घोटाळ्याच्या चौकशीची मी मागणी केली आहे. त्यामुळे माझ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवसेनेविरोधात बोलणं ही पक्षविरोधी कारवाई होऊ शकते का? मुंबई काँग्रेस शिवसेनेत विलीन झाली आहे का?, असा प्रश्नांचा भडिमार निरुपम यांनी ट्विटद्वारे केला आहे. निरुपम यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ट्विटरवरुन व्यक्त केलेल्या नाराजीवरुनही निरुपम यांनी भाष्य केले. महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीचा फोटो ट्विट करत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेस सहभागी आहे असं ऐकलं ना? मग युवकांना रोजगार देणाऱ्या सरकारी जाहिरातीत काँग्रेस कुठे आहे? ज्या काँग्रेस नेत्यांना शिवसेनेवर अथांग प्रेम झालं आहे. त्यांना माझे प्रश्न आहेत. शिवसेनेसमोर लोटांगण घालण्यापेक्षा त्यांच्याशी लढा अन्यथा पक्ष संपून जाईल असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
तर दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते संजय झा यांचंही पक्षात निलंबन करण्यात आलं होतं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने याबाबत ट्विट करुन माहिती दिली होती. त्यावर संजय झा यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना प्रश्न विचारला आहे. कोणत्याही प्रकारची नोटिस न देता मला म्हणणं मांडायची संधी न देता माझं निलंबन करण्यात आलं. ही पक्षांतंर्गत लोकशाही आहे का?
News English Summary: I only criticized Shiv Sena. What has it got to do with anti-party activities? Has Mumbai Congress merged with Shiv Sena? This question has been asked by Sanjay Nirupam.
News English Title: Is speaking against Shivsena an anti party activity? Says Congress leader Sanjay Nirupam News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं