ऑनलाईन शिक्षणातून काहीच समजत नसल्याच्या नैराश्यातून तरुणीची आत्महत्या

कोल्हापूर, १७ जुलै : कोल्हापूरमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐश्वर्या पाटील असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव असून ती कोल्हापूर जिल्ह्यातील वाशी येथील रहिवाशी आहे.
ऐश्वर्या बाबासो बाटील असं या वीस वर्षीय तरूणीचं नाव आहे. करवीर तालुक्यातील वाशी या गावात राहणारी तरूणी. पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या पाटील ही एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. कोरोना संसर्गामुळे सध्या शिकवण्याचे वर्ग ऑनलाईन सुरू होते. पण ऑनलाईन शिक्षण तिला जमत नव्हते. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ती अस्वस्थ आणि निराश होती.
याच नैराश्यातून तिने राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी तातडीने तरूणीला रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. उच्चशिक्षणाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऐश्वर्याच्या मृत्यूने पाटील कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तसंच 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येनं परिसरातही शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद करवीर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
News English Summary: A student of B Pharmacy has committed suicide in Kolhapur. Aishwarya Patil is a 20 year old student from Vashi in Kolhapur district.
News English Title: A student of B Pharmacy has committed suicide in Kolhapur News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं