पुणेकरांना जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लॉकडाउनमधून एकदिवसाचा दिलासा

पुणे, १८ जुलै : कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पुण्यात पुन्हा एकदा कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात दहा दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात १४ जुलैपासून जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने बंद होती.
पण उद्या रविवारचा एकदिवस नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता यावी यासाठी लॉकडाउन थोडा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत चालू राहणार आहेत. त्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. फक्त एक दिवसासाठी ही सवलत देण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर राखून नियमांचे पालन करुन नागरिकांनी खरेदी करावी असे आदेशामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, कोरोना नियंत्रणाच्या मुंबईतील अनुभवाच्या आधारावर इक्बाल सिंह चहल यांनी पुणे प्रशासनाला या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पुण्यात बैठक घेतली. शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पुण्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या पन्नास हजारांवर गेली आहे.
मागील दोन दिवसांत रुग्ण वाढीमध्ये पुण्याने मुंबईला मागे टाकलंय. १५ जुलै ला मुंबईत १३९० तर पुण्यात १४१६ रुग्णांचे निदान झाले. १६ जुलै ला ही संख्या १४९८ आणि १८१२ अशी होती. अशा परिस्थितीत पुण्याने मुंबईच अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. शहरासह जिल्ह्याचा एकात्मिक आराखडा तयार करून कामात गतिमानता आणण्याची गरज इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केलीय.
News English Summary: It has been decided to relax the lockdown a bit so that citizens can buy essential items for one day tomorrow, Sunday. Tomorrow all the shops selling essentials, retail, mutton, chicken, fish, eggs will be open from 8 am to 6 pm.
News English Title: For Single Day Lockdown Relaxation In Pune News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं