राम मंदिराच्या ई-भूमिपूजनाबाबत MIM आणि मुख्यमंत्र्यांचं मत एकसारखंच - फडणवीस

मुंबई, २८ जुलै : सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात पवारांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.
त्यावेळी ‘शरद पवारांनी राम मंदिराबद्दल जे काही वक्तव्य केले आहे, ते मुस्लीम समाजाला खूश करण्यासाठी केले तर नाही ना? हे पाहावे लागेल’, असं दरेकर म्हणाले होते. तसंच,राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पण, अजून उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. ‘अयोध्येत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांच्या एनओसीची गरज लागणार नाही, ही अपेक्षा आहे, असं म्हणत दरेकरांनी पवारांना टोला लगावला होता.
त्यानंतर, या विषयावरून शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. त्याच मालिकेत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. अयोध्येतील राम मंदिराचं ई-भूमिपूजन करा, असं मत एमआयएमनं मांडलं आहे. आता तसंच मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मांडलंय, याचं आश्चर्य वाटतं, असा टोमणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मारला.
News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has tweaked Chief Minister Uddhav Thackeray. E-bhumi pujan of Ram temple in Ayodhya, is the opinion of MIM. Now it is surprising that Chief Minister Uddhav Thackeray has also expressed his views, said Devendra Fadnavis, Leader of Opposition in the Legislative Assembly.
News English Title: Ram Mandir Bhumipoojan Devendra Fadnavis taunts CM Uddhav Thackeray News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं