राज्यात आज ११ हजार १४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर २६६ रुग्णांचा मृत्यू

मुंबई, ३० जुलै : १ ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओमची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात ११,१४७ एवढ्या उच्चांकी कोरोनारुग्णांचं निदान झालं. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यातून आहे. पुण्यात गेल्या २४ तासांत ५२ रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच ही भीषण आकडेवारी आली आहे.
Maharashtra reports 266 deaths and 11,147 new #COVID19 cases today. The total number of cases is now 4,11,798 including 2,48,615 recovered cases and 1,48,150 active cases: State Health Department pic.twitter.com/EgmojRKGCZ
— ANI (@ANI) July 30, 2020
दिवसभरात ८८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २ लाख ४८ हजार ६१५ उपचारानंतर पूर्ण बरे झाले असून घऱी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रिकव्हरी रेट सध्या ६०.७३ टक्के इतका आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० लाख ७० हजार १२८ नमुन्यांपैकी ४ लाख ११ हजार ७९८ नमुने पॉझिटिव्ह (१९.८९ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४ हजार १४१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४० हजार ५४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
News English Summary: Maharashtra reports 266 deaths and 11,147 new COVID19 cases today. The total number of cases is now 4,11,798 including 2,48,615 recovered cases and 1,48,150 active cases says State Health Department.
News English Title: Coronavirus Maharashtra Reports 266 Deaths And 11147 New Cases News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं