२०१९ मध्ये सोनिया असो की प्रियांका गांधी, रायबरेलीतून पडणार

नवी दिल्ली : काँग्रेसचे फुटीरवादी नेते दिनेश प्रताप सिंह हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यावेळी अमित शहा यांची उपस्थिती असेल. परंतु भाजप प्रवेशाआधी त्यांनी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.
दिनेश प्रताप सिंह यांनी थेट सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावरच निशाणा साधत भाजपच्या पक्ष श्रेष्ठीना खुश करण्याचा प्रयत्नं केला आहे. पुढे दिनेश प्रताप सिंह असं म्हणाले की माझा भाऊ राकेश सिंहला २०१७ मध्ये भाजपने विधानसभेची उमेदवारी देऊ केली होती. परंतु माझ्या विनंतीवरून त्याने ती नाकारली होती.
राकेश सिंहला ला तिकीट देण्याची विनंती प्रियांका गांधी यांना केली होती, परंतु त्यांनी ती धुडकावून लावली होती. तसेच रायबरेलीतून ठाकूर समाजाच्या माणसाला तिकिट देणार नाही असं स्पष्ट केलं होत. शेवटी त्यांनी त्याला हरचंदपूर येथून विधानसभेची उमेदवारी दिली होती. परंतु काँग्रेसने दिनेश प्रताप सिंह यांचे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत.
दिनेश प्रताप सिंह म्हणाले की मी काँगेससाठी खूप काही केलं परंतु त्यांच्या मोबदल्यात मला मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु प्रियांका गांधी यांच्या विरोधामुळे ते मला मिळालं नाही अशी थेट टीका प्रियांका गांधी यांच्यावर केली. भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे दिनेश प्रताप सिंह असे खोटे आरोप करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं