सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीआधीच भाजपकडून राष्ट्रवादीला धक्का

मालवण, १० ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल,” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. मात्र त्यापूर्वीच भाजपने राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रासंबंधित धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याची पुन्हा भाजपावासी झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे , विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.
जिल्हा बँक निवडणुकीआधीच खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे. मागील ३५ वर्षे सातत्याने सहकार क्षेत्रात गुलाबराव कार्यरत आहेत आणि सहकारमहर्षी कै. शिवरामभाऊ जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून गुलाबराव यांची आहे ओळख आहे. मालवण येथील राणेंच्या निलरत्न बंगल्यावर त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. गुलाबराव चव्हाण यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, अशोक सावंत, वैभववाडी माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांची होती प्रमुख उपस्थिती होती.
News English Summary: In the presence of former Chief Minister Narayan Rane, Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar, MLA Ravindra Chavan, MLA Prasad Lad, MLA Nitesh Rane, District Bank Director Gulabrao Chavan has taken up the BJP flag.
News English Title: NCP Leader Gulabrao Chavhan join BJP in presence Devendra Fadanvis MP Narayan Rane News latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं