आता संजय राऊत यांनीच शांत राहावे, CBI न्याय करेल | भाजपचं प्रतिउत्तर

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट – सुशांतसिंग प्रकरणात सीबीआय काय वेगळा तपास करणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर काही राहिलं असं वाटत असेल तर जगातील कोणत्या संस्थेला तपास द्यावा,” असं संजय राऊत यांनी म्हटलं. सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख होत असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मोठ्या लोकांची किंवा त्यांच्या कुटुंबाची नावं घेतल्याशिवाय प्रकरणाला सनसनाटी निर्माण होत नाही असं एक सूत्र झालं आहे. आदित्य ठाकरेंचं नाव कोणीही कुठेही घेतलेलं नाही. पोलीस जो तपास करत आहेत त्यांना शांतपणे तपास करु देणं हे त्या प्रकरणाच्या आणि सुशांतला न्याय मिळण्याच्या दृष्टीने सोयीचं आहे. न्याय हवा असेल तर सुशांतच्या कुटुंबीयांनी काही काळ शांत राहावं आणि मुंबई पोलिसांच्या तपासात सहकार्य करावं.
दरम्यान, भाजपाकडून राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आता संजय राऊत यांनीच शांत राहावे, सीबीआय न्याय करेल, असा टोला भाजपा नेते शाहनवाझ हुसेन यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शाहनवाझ हुसेन म्हणाले की, संजय राऊतजी, साहेब न्याय देता देता तुम्ही बराच उशीर केला. आता तुम्ही सांगता की, सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबीय शांत राहिले तर न्याय मिळेल म्हणून. त्यापेक्षा आता तुम्हीच शांत राहा, सीबीआय न्याय करेल.
News English Summary: The BJP has responded strongly to Raut. BJP leader Shahnawaz Hussain has demanded that Sanjay Raut should remain calm and the CBI will do justice.
News English Title: MP Sanjay Raut now you keep calm CBI will do justice BJP leader Shahnawaz Hussain News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं