नाशिकला 'स्मार्ट दिशा' देणारे 'राज' आणि आता मैदानांचा स्मार्ट सिटीच्या नावाने 'गेम' ?

नाशिक : मनसेची नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी नाशिकला वेगळी ओळख करून देण्याचा प्रयत्नं केला होता. विशेष म्हणजे नाशिक शहरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीला धक्के न देता पायाभूत सुविधांची उत्तम काम केली जात होती. एखाद शहर स्मार्ट बनविण्यासाठी त्याला ‘स्मार्ट सिटीचा’ अधिकृत दर्जाचं गरजेचा असतो असं काही नाही.
स्मार्ट सिटीच्या नावाने जर खेळाच्या मैदानांचा स्मार्ट ‘गेम’ होणार असेल तर स्थानिकांनी करायचे तरी काय ? तसेच स्मार्ट सिटीमध्ये खेळाची मैदानं नसतात का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. तसाच काही प्रकार नाशिकमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाने सुरु आहे.
नाशिक महानगर पालिकेने नुकताच अशोक स्तंभ ते गडकरी चौक पर्यंत स्मार्ट सिटीच्या अंतर्गत स्मार्ट रोडची घोषणा केली आहे. त्यानुसार हायस्कुल ग्राउंड (शिवाजी स्टेडिअम) सी.बी.एस नाशिक येथे संकल्पित दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली आहे. परंतु त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उरलेले एकमेव मैदान वाचविण्यासाठी विविध क्रीडा संघटना पुढे सरसावल्या आहेत. संकल्पित भुयारी पार्किंग निर्मितीला विरोध करण्यासाठी जनआंदोलन उभं करण्यासाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेला विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे कायम स्वरूपी खेळासाठी उपलब्ध ठेवावे असे मा. उच्च न्यायालयाचे निर्देश असताना पालिका प्रशासन स्मार्ट सिटीच्या नावाने हा घाट घालत असल्याचं राज्य खो खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख म्हणाले. याच मैदानावर खो खो, तलवारबाजी, फुटबॉल, धनुर्विद्या, कॅरम आणि अनेक स्पर्धांचे उपक्रम राबविले जातात.
एकीकडे केंद्रीय खेळ मंत्रालय म्हणतय ‘खेलो इंडिया खेलो’ आणि दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या नावाने महत्वाच्या मैदानांचाच स्मार्ट ‘गेम’ करायची ही योजना आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. नाशिकच्या स्थानिक आणि प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांनी सुद्धा या संघटनांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सध्या स्मार्ट सिटीच्या नावाने नाशिक मध्ये सगळंच गोधळात टाकणारं वातावरण आहे. नाशिकच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न हा भाजपच्या स्मार्ट सिटीतुन नाही, तर राज ठाकरेंनी मनसेच्या काळात राबविलेल्या स्मार्ट व्हिजन मधूनच साध्य झाला असता असं आता नाशिककरांना वाटू लागलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं