बुलेट-ट्रेनचा घाट मोदींचा दिखाऊ हट्ट ? म्हणजे राज ठाकरें योग्य बोलत आहेत ? व्हिडिओ व्हायरल

पालघर : २०१३ मध्ये म्हणजे भारताचे पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदींनी आयएमसी मध्ये उपस्थितांना संबोधित करताना बुलेट ट्रेन बनविण्यामागचा उद्देश आणि वास्तव स्वतःच सांगितलं होत. त्यामुळे बुलेट-ट्रेनच्या नावाने देश अरबो रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली ढकलून आणि हजारो संसार उध्वस्त करून, बुलेट-ट्रेनच्या नावाने केवळ जगाला देखावा करायचा हाच मोदींचा हट्ट असल्याचं या व्हिडिओ मध्ये उघड होत आहे.
एकूणच संपूर्ण पालघर आणि ठाण्यातून जाणारी प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने १४८.७२ किमीच्या मार्गावरील लाखो शेतकरी कुटुंबीयांच्या जमिनी, घरे आणि शेती उध्वस्त होणार आहेत. तसेच डेडिकेटेट फ्रेट कॉरिडॉर व मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे अशा प्रकल्पामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्यांची उपजीविका असलेल्या शेत जमिनीवर वरवंटा फिरताना बघावा लागू शकतो.
जिंदाल जेट्टीमुळे परिसरातील नवापूर, मुरबे, सातपाटी, उच्छेळी-दांडी, वडराई सारख्या ठिकाणी मासेमारी बंदराना धोका पोहोचून त्या बंदरासमोरील मासळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला ‘गोल्डन बेल्ट’च पूर्णपणे संपुष्ठात येणार होता. तसेच स्थानिकांचा जेट्टीला प्रखर विरोध असताना सुद्धा जवळच अणुऊर्जा प्रकल्प होणार असल्याने प्रदूषणात प्रचंड वाढ होऊन येथील पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे, तरी सुद्धा भाजप शिवसेना सरकारने वाढवण बंदराची घोषणा करून इथल्या स्थानिकांच्या भावनांचा अनादर केला आहे अशी त्यांची ठाम भावना आहे.
सादर व्हिडिओ मध्ये मोदी स्वतःच स्पष्टं करत आहेत कि, बुलेट ट्रेन हे केवळ इतर देशांना दाखविण्याचे ‘कारण’ आहे. तसं बुलेट-ट्रेन मधून प्रवास कोण करणार आहे ? याचाच अर्थ हा की, हजारो करोडो रुपयाचे कर्ज राज्यावर लादून केवळ जगाला देखावा करण्यासाठी म्हणून मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट घातला जात आहे. इतकेच नाही तर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनने १४८.७२ किमीच्या मार्गावरील लाखो शेतकरी कुटुंबीयांच्या जमिनी, घरे आणि शेती उध्वस्त होणार आहेत.
मोदींच्याच सांगण्या प्रमाणे जर प्रवासी ही बुलेट – ट्रेन वापरणारच नसतील तर लाखो रुपयाचे कर्ज आणि हजारो शेतकऱ्यांची कुटुंब उध्वस्त करून मोदी सरकार नक्की साधणार तरी काय आहे. केवळ जगाला दाखविण्यासाठी अर्थव्यवस्था बळकटीचे हे कुठले जीवघेणे प्रयोग मोदी सरकार करत आहे हे समजण्या पलीकडचं आहे.
मुळात विरोध हा बुलेट ट्रेनला नसून मुंबई – अहमदाबाद या मार्गाला आहे. इतक्या कमी अंतराच्या दोन शहरांना बुलेट ट्रेनने जोडले तरी प्रत्यक्ष महाराष्ट्राला त्याचा काहीच फायदा होणार नाही हे स्पष्टं आहे. केंद्र सरकारने असे प्रकल्प लांब पल्ल्याच्या अंतरांना कमी करण्यासाठी राबविणे गरजेचे आहे. जर मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील प्रवाशांच्या हाताला काहीच लागणार नसेल तर स्थानिकांच्या मागणीनुसार राज ठाकरे यांनी बुलेट-ट्रेनला प्रखर विरोध दर्शविला तर त्यात चूक ते काय ? त्यामुळे राज ठाकरेंच्या या भूमिकेचं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वसलेला सामान्य माणूस सुद्धा स्वागतच करेल कारण तोच मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मुळे खऱ्या अर्थाने भरडला जाणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं