मराठी भावगीतांचा 'शुक्रतारा' हरपला, अरुण दाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ मराठी भावगीत गायक अरुण दाते यांचं आज मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी अरुण दाते यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी पहाटे ६ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आणि खऱ्याअर्थाने मराठी भावगीतांचा ‘शुक्रतारा’ हरपला.
अरुण दाते हे मुंबईमध्ये त्यांच्या मुलासोबत राहत होते. वयोमानामुळे अरुण दातेंची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. अखेर मुंबई स्थित कांजुरमार्गमधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने समस्त मराठी चित्रपट श्रुष्टीत शोककळा पसरली असून आज खऱ्या अर्थाने मराठी भावगीतांचा ‘शुक्रतारा’ हरपला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांची अनेक अजरामर गाणी आजही समस्त महाराष्ट्र दैनंदिन आयुष्यात गुणगुणत असतो. मराठी भावगीतांच्या बाबतीत बोलायचं झालाच तर मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते ही जोडी महाराष्ट्रालात फारच प्रसिद्ध होती. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्रतारा मंदवारा, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी ही त्यांची काही प्रसिद्ध झालेली गाणी आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं