कर्नाटक मध्ये जनतेचा कौल काँग्रेसला: महासर्व्हे

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल तर भाजप पिछाडीवर पडेल असं लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने केलेल्या महासर्व्हे मध्ये समोर आलं आहे.
विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या कामकाजावर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे असं महासर्व्हेत समोर येत आहे. तर भाजप हा सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष म्हणून मत नोंदविण्यात आलं असून त्यात काँग्रेस व्दितीय स्थानी आहे. एबीपी न्यूजने लोकनीती-सीएसडीएस यांनी सोबत मिळून २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान हा सर्व्हे केला आहे. एकूण ५६ विधानसभा मतदारसंघांमधील २४४ बूथवर जाऊन ४,९२९ मतदारांचं मत जाणून घेण्यात आलं असं सांगण्यात आलं.
काय आहे लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने केलेल्या महासर्व्हे मध्ये;
विधानसभेच्या सर्वाधिक जागा कोणाला ?
१. काँग्रेस ९२ ते १०२ जागा
२. भाजप ७९ ते ८९ जागा
३. जेडीएस ३२ ते ४२ जागा
४. इतर १ ते ७ जागा
एकूण मतांची टक्केवारी ?
१. काँग्रेस ३८ टक्के
२. भाजप ३३ टक्के
३.जेडीएस २२ टक्के
मोदी सरकारच्या कामकाज जनतेला कसं वाटलं ?
१. खुप चांगलं २३ टक्के
२. चांगलं ४५ टक्के
३. वाईट १६ टक्के
४. अत्यंत वाईट १२ टक्के
सिद्धरमैय्या सरकारची कामगिरी कशी आहे ?
१. खुप चांगलं २९ टक्के
२. चांगलं ४३ टक्के
३. वाईट १५ टक्के
४. अत्यंत वाईट १० टक्के
कर्नाटकातील जनतेसाठी सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता ?
१. काँग्रेस ४१ टक्के
२. भाजप ४४ टक्के
३. जेडीएस ४ टक्के
लिंगायत समाज कोणाच्या पारड्यात मतं टाकतील ?
१. काँग्रेस १८ टक्के
२. भाजप ६१ टक्के
३. जेडीएस ११ टक्के
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं