पंकज भुजबळ काल राज ठाकरे व उद्धव ठाकरेंना भेटले

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी पंकज भुजबळ यांनी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. तत्पूर्वी मंगळवारी रात्री पंकज भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही वर्षा निवासस्थानी भेट घेऊन छगन भुजबळांना सुरक्षा पुरविण्याची विनंती केली होती.
काही दिवसांपूर्वी भुजबळ समर्थकांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवास्थानी भेट घेतली होती. आता छगन भुजबळ यांना न्यायालयातून जमीन मिळताच त्यांनी पंकज भुजबळ यांना राज ठाकरेंची भेट घेण्याचा सल्ला दिला असं म्हटलं जात. राज ठाकरे यांच्याशी काही वेळ चर्चा केल्यानंतर पंकज भुजबळ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.
भुजबळ हे आधी शिवसेनेत होते आणि नंतर काही राजकीय कारणांनी ते शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून नव्याने स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले होते. बाळासाहेब ठाकरेंना अटक करून, त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती ती भुजबळांमुळेच, त्यामुळे शिवसेनेत छगन भुजबळां प्रति प्रचंड राग होता. त्याचाच प्रत्यय असा की संधी मिळताच राज ठाकरे सुद्धा छगन भुजबळांवर सडकून टीका करायचे.
कालांतराने सर्व इतिहास मागे पडला आणि छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या वयाचा मान राखत, त्यांच्या विरोधातील खटला न्यायालयातून मागे घेतला होता आणि मातोश्रीवर जाऊन भोजनाचा आनंद सुद्धा घेतला होता. आज त्यांनी अनुभवलेले कटू राजकीय अनुभव पाहता, राष्ट्रवादीचे नेते असून सुद्धा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेण्यापेक्षा, त्यांनी पंकज भुजबळा यांना दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेण्यासाठी धाडले यातच सर्व आलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं