मराठा आरक्षणावरून निलेश राणेंचा प्रकाश आंबेडकरांना दम ? सविस्तर

पुणे : नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याची टीका केल्याने माजी खासदार निलेश राणे हे प्रकाश आंबेडकरांवर चांगलेच संतापले आहेत. निलेश राणेंनी प्रकाश आंबेडकरांना थेट आवाहन देत, ‘राणेसाहेबांबरोबर समोरासमोर चर्चा करण्याचा दम आहे कां? असा प्रश्न विचारला आहे.
भारिप बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी खासदार नारायण राणे यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून टीका केली होती. नारायण राणेंनी मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केला अशी टीका ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या या टीकेलाच माजी खासदार निलेश राणे यांनी थेट उत्तर दिल आहे. निलेश राणेंनी प्रकाश आंबेडकरांना थेट आवाहन देत, ‘राणेसाहेबांबरोबर समोरासमोर चर्चा करण्याचा दम आहे कां? असा ट्विट करत थेट आवाहन दिलं आहे. पुढे निलेश राणे कोपर्डी घटनेचा उल्लेख करत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर कोपर्डीच्या घटने वेळी गप गार-गार होते आणि अचानक कोरेगाव-भीमा वेळी जीवंत झाले. गप घरी बसून आंदोलन करणारे प्रकाश आंबेडकर संभाजी भिडेंना एक दिवस सुद्धा तुरुंगात टाकू शकले नाहीत, असेही निलेश राणे प्रकाश आंबेडकरांना उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले आहेत निलेश राणे प्रकाश आंबेडकरांना ट्विट करत ?
वेळ मी देतो राणे साहेबांचा, ये आणी समोरा समोर माहिती घे.. आहे दम??? कोपर्डी सारख्या घटनेला हा घप घार होता तो भिमा कोरेगावला जिवंत झाला. घरी बसून आंनदोलन करणारा आणी जे दलीत रस्त्यावर उतरले त्यांना अटक करा सांगणारा हा फाटक्या संभाजी भिडेंना एक दिवस सूध्दा आत टाकू शकला नाही. https://t.co/rhMxwvBedi
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 9, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं