शिशिर शिंदे शिवसेनेत जाणार, पण मनसेला फायदा की सेनेला नुकसान ? सविस्तर

मुंबई : मनसेचे भांडुप विधानसभा मतदार संघातील माजी आमदार शिशिर हे लवकरच शिवसेनेत जाणार असल्याचे वृत्त आहे. तस असलं तरी त्याने मनसेला काहीच फरक पडणार नसल्याचे एकूणच चित्र आहे असं दिसतं. मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे शिशिर शिंदे यांच्या विरुद्ध पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल हरकती नोंदविल्या होत्या.
शिशिर शिंदे यांनी मुलुंड आणि भांडुप मतदारसंघात पक्ष विरोधी कारवाई केल्याचा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आरोप होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलूंड आणि भांडुप मधील स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या विचाराला आणि मेहनतीला मान देत शिशिर शिंदे यांना पक्षाच्या महत्वाच्या विषयांपासून दूर ठेवणं पसंत केलं. त्यामुळे स्थानिक नेते राज ठाकरेंच्या आक्रमक आणि रोखठोक कारवाईने आनंदी होऊन मुलुंड आणि भांडुप मतदारसंघात अजून जोमाने पक्षाचे काम करू लागल्याचे चित्र आहे.
मुलुंड आणि भांडुप मतदारसंघाचा एकूणच आढावा घेतल्यास शिशिर शिंदे हे जवळ जवळ ४ वर्षांपासून कुठेच नव्हते. तसेच राज ठाकरेंनी शिशिर शिंदेंना वगळून केलेल्या नव्या नियुक्त्यांमुळे मनसे मुलुंड आणि भांडुपमध्ये अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे. शिशिर शिंदे जरी शिवसेनेत गेले तरी त्याचा शिवसेनेला काही फायदा होईल असं चित्र अजिबात नाही. उलट शिशिर शिंदे जर शिवसेनेत गेले तर मुलुंड आणि भांडुप मधील जुने शिवसैनिक सुद्धा बंड करतील असं चित्र आहे. त्यामुळे शिशिर शिंदेच्या शिवसेना प्रवेशाने त्याचा फायदा किती, यापेक्षा त्याने किती नुकसान होईल याचाच आधी अभ्यास करावा लागेल.
शिशिर शिंदेचा शिवसेना प्रवेश म्हणजे केवळ मनसेला डिवचने एवढाच राजकीय अर्थ सध्या तरी निघू शकतो. परंतु त्यांचा शिवसेनेला फायदा किती होईल हा सध्या मुलुंड आणि भांडुपमध्ये संशोधनाचा विषय होऊ शकतो. दुसरी शक्यता ही आहे की, जर उद्या त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांनी मुलुंड आणि भांडुप मध्ये तेच केलं जे त्यांनी मनसेत असताना महापालिका निवडणुकीदरम्यान मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांविरुद्ध केलं होता, तर केवळ मनसेला डिवचण्यासाठी केलेला हा प्रयोग लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या अंगलट येऊन येऊ शकतो आणि त्याचा फायदा मनसेला होईल असं चित्र निर्माण झाल्यास आश्चर्य वाटावयास नको.
शिशिर शिंदेचा थोडाफार प्रभाव उरला असलेल्या क्षेत्रात सेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांचे काम आहे. जर उद्या तिथला शिशिर शिंदे यांच्यावर नाराज असलेला गट कार्यरत झाला तर त्याचा त्रास हा सेनेचे विद्यमान आमदार सुनील राऊत यांना होण्याची शक्यता आहे.
एकूणच शिशिर शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशाने मुलुंड आणि भांडुप मधील स्थानिक मनसेला काही नुकसान होईल असं चित्र नाही. उलट पक्षी त्यांना सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत स्थनिक पातळीवर किती अधिकार देतील यावरच प्रश्न चिन्हं आहे. त्यामुळे एकूणच मुलुंड आणि भांडुप मधील मनसेच्या राजकीय स्थितीचा आढावा घेतल्यास हा सर्व खटाटोप म्हणजे केवळ मनसेला डिवचण्याचा प्रकार एवढाच राजकीय अंदाज बांधावा लागेल. परंतु शिशिर शिंदेंच्या सेनेतील प्रवेशाने स्थानिक शिवसेनेतच दुफळी माजणार नाही याची काळजी नैतृत्वाला अधिक घ्यावी लागेल असंच काहीस चित्र सध्यातरी आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं