कराडांबाबत पवारांनी सांगितलेलं कारण खरं निघालं

लातूर : रमेश कराड यांनी पंकजा मुंडेंना दुर्लक्षित करत राष्ट्रवादीत विधानपरिषदेच्या तोंडावर प्रवेश केला खरा, पण त्यांनी ५ दिवसात राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी उमेदवारी मिळून सुद्धा का पक्ष का सोडला याचे अनेक तर्क वितर्क जोडले गेले. काहींनी त्याचा दोष धनंजय मुडेंना सुद्धा दिला. परंतु काही दिवसांपूर्वी स्वतः शरद पवारांनी त्यामागे उमेदवाराची आर्थिक कुवत हे कारण दिल होत.
इतकच नाही तर रमेश कराड यांच्या निर्णयामागे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा मास्टरस्ट्रोक वगरे बोललं जाऊ लागलं. परंतु ते सर्व चुकीचे तर्क होते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवारांनी दिलेलं कारण योग्य असल्याच समोर आलं आहे. स्वतः रमेश कराड यांनी एका खासगी वृत्त वहिनीला खरं कारण सांगितलं आहे.
रमेश कराड म्हणाले की, मी पक्षाच्या आदेशाप्रमाणे विधानपरिषदेची अर्ज दाखल केला. परंतु मला आधी ठरवलेल्या बजेटपेक्षा अधिक पैसे मागण्यात आले. त्यामुळे माझ्या आर्थिक कुवतीप्रमाणे ते शक्य नव्हतं. त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी सोडून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला असं ते म्हणाले.
पुढे रमेश कराड असं म्हणाले की, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. तसेच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत असलेलं नातं हे रक्ताच्या नात्यापेक्षा मोठं आहे. त्यामुळे कुठेतरी चुकल्यासारखं वाटू लागलं म्हणून कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत भाजपात काम केलं आहे व भविष्यातही भाजपसाठी काम करणार असं कराड यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं