सुप्रिया सुळेंचे तावडेंना आव्हान, मी काय खोटे बोलले ते सांगा?

पुणे : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मागे आरोप केला होता की, राज्यातील शाळा बंद करण्याच्या धोरणाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे या खोटे बोलतात आहेत. त्यालाच अनुसरून खासदार सुप्रिया सुळेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना आव्हान दिल की,’शिक्षणमंत्र्यांनी आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे’.
राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या शाळा बंदच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. शाळांचे समायोजन करताना सरकारकडून शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत असून शाळा बंद करताना सरकारने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही पर्यायांचा विचार केलेला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शिरूर तालुक्यातील भिल्लवस्तीमधील शाळा बंद करून सरकारने तेथील मुलांचे शिंदोडीतील शाळेत समायोजन केले आहे. परंतु, मुलांना शाळेत जाण्यासाठी एक-दीड किलोमीटर नव्हे, तर तब्बल ३ किलोमीटर पायपीट करत पोहोचावं लागणार आहे. बारामतीमधील गारमळा येथील विद्यार्थ्यांच सुद्धा तेच होणार आहे.
महाराष्ट्रातील असंख्य शाळा ग्रामस्थ, ग्रामपंचायती व जिल्हा परिषद यांचा विरोध असतानाही शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. परंतु त्यातून विद्यार्थ्यांची केवळ फरफट होणार असून, सरकारकडून ती फरफट दुर्लक्षित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासाचा विचार सरकारने “पालक’ म्हणून केलाय का?, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
शाळा : समायोजन झालेली शाळा : अंतर (कि.मी)
बागलफाटा : बावडा : २.५
शास्ताबाद तालुका शिरूर: उकीरडेवस्ती : १.७
पवारवस्ती तालुका इंदापूर: वायसेवाडी : ०२
भिल्लवस्ती तालुका शिंदोडी : २.९
वेलहावळे तालुका खेड: काळोखेवस्ती : १.८
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं