दोघांविरोधात कोर्टात खटले सुरु | तरी फडणवीसांची अर्णव, कंगनासाठी अधिवेशनात बॅटिंग

मुंबई, १५ डिसेंबर: रिपब्लिक टीव्हीचे मालक अर्णव गोस्वामी यांची अटक व कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील कारवाईच्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘खून करणाऱ्यास फाशी झालीच पाहिजे, चोरी करणाऱ्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण हे पाकिस्तान नाही. इथं कायद्याचं राज्य आहे, ते कायद्यानंच चालवा,’ असा टोला फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना हाणला.
अर्णब गोस्वामींविरोधात कारवाई करण्यासाठी राज्यात ५० कायदे आहेत. पण आपण काय केलं? त्यांची बंद झालेली केस ओपन केली. हे चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले. या सरकारविरोधात एक वाक्यही बोललं तरी गुन्हा दाखल केला जातो. मुस्कटदाबीचा हा प्रकार आहे. आमच्या काळातही आमच्याविरोधात बोललं गेलं. पण आम्ही कुणाविरोधात गुन्हे दाखल केले नाही. पण या सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकलं जातं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच करायला हवा. विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख कसाही केला तरी चालेल. त्यासाठी विरोधी पक्ष सक्षम आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.
“आमच्यावेळी विरोधात लिहिलं म्हणून कोणाला जेलमध्ये टाकलं नाही. सोशल मीडियावरील अनेक लोकांना नोटीस पाठवून एक सत्र सुरु आहे. मुस्कटबाजी सुरु आहे. माझं, सुधीर मुनगंटीवार आमचं कार्टून आलं त्यावर गलिच्छ लिहिलं त्यावर कारवाई नाही,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. “अर्णब गोस्वामी चुकीचं वागत होते, ५० कायदे आपल्याकडे आहेत. ज्याच्या माध्यमातून कारवाई केली जाऊ शकत होती. पण यांनी बंद झालेली केस ओपन केली,” असा आरोप फडणवीसांनी केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी नेत्यांना सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचा असं सांगत हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही असं सुनावलं. फडणवीसांनी यावेळी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णयही वाचून दाखवला.
“अर्णब गोस्वामीने माझ्याविरोधातही ट्रायल चालवलं होतं. तीनवेळा चालवलं होतं. एकदा तर मी अमेरिकेत असताना गुंतवणूकदारांची भेट घेत असताना ते कॅमेरे वेगळंच काम करत होते. याचा अर्थ भारतात आल्यावर मी त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. तर भारतात येऊन उत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या देशात कायदा आहे,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis today lashed out at the state government over the arrest of Republic TV owner Arnav Goswami and the crackdown on Kangana Ranaut’s office. ‘The murderer must be hanged, the thief must be punished. But this is not Pakistan. There is rule of law here, run it by law, ‘said Tola Fadnavis.
News English Title: Devendra Fadnavis criticized state government over Arnab Goswami and Kangana case news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं