बाहेर तर आलो आता खायचं काय? बघतो तर खात्यात १५ लाख जमा: भुजबळ

पुणे : काल पुण्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचा समारोप झाला. त्याला माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच हल्लाबोल यात्रेत कार्यकर्त्यांना संबोधीत केलं. मोदी सरकारच्या फसव्या घोषनांची भुजबळांनी चांगलीच खिल्ली उडविली.
छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आल्यावर त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली होती. त्याचाच धागा पकडत छगन भुजबळांनी मोदींच्या एका घोषणेची चांगलीच खिल्ली उडविली आणि उपस्थितांना हसू आवरेना झालं.
जप्त केलेल्या संपत्तीच उदाहरण पुढे करत भुजबळ म्हणाले की, ‘तुरुंगातून बाहेर आलो, आता खायचं प्यायचं काय असा प्रश्न मनात आला. पण बघतो तर काय, माझ्या सर्व कुटुंबियांच्या खात्यात १५ – १५ लाख रुपये जमा झाले होते, मग काय प्रश्नच मिटला’ असं छगन भुजबळ उपहासात्मक म्हणाले आणि उपस्थितांना हसू आवरेना झालं. परंतु मोदींच्या सर्वच घोषणांची भुजबळांनी चांगलीच फिरकी घेतली असं एकूणच चित्र होत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं