मी होतो म्हणून शिवसेनेची कोकणात ताकद होती - नारायण राणे

कणकवली, १८ जानेवारी: कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केले. महाविकासआघाडीने भारतीय जनता पक्षाला दणका वैगेरे दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. तर वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडू केला जात आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे शिवसेना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, “कोकणात नारायण राणे यांचं अस्तित्व कधीच संपलं आहे. राणेंबद्दल बोलण्यात मला काहीच स्वारस्य नाही. कारण ते तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते. शिवसेनेला ग्रामीण भागात जनाधार आहे. भारतीय जनता पक्षाची संस्कृती विसरून बेछूट आरोप करत आहे. मात्र, हे चुकीचं आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा बेशरमपणा, असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते करताय हे अयोग्य असल्याचं आमदार भास्कर जाधव यांनी सांगितलं.
News English Summary: It is learned that BJP flag has been hoisted on 47 out of 70 gram panchayats in Sindhudurg district dominated by Narayan Rane. The BJP leaders are claiming that the BJP has achieved great success in all the areas of Vaibhavwadi, Malvan and Kudal. This is considered to be a big blow to Shiv Sena’s dominance in Konkan.
News English Title: BJP MP Narayan Rane talked on Shivsena after Gram Panchayat 2020 Result news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं