ट्रेनच्या शौचालयात मुलीवर बलात्कार | 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

मुंबई, १४ फेब्रुवारी: प्रवासी ट्रेनच्या शौचालयात एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोरखपूर एक्सप्रेस ट्रेन प्रवासादरम्यान ही घटना घडली. घटनेची गंभीर नोंद घेत ठाणे पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या तरुणावर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आरोप आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी रविवारी दिली.
तक्रारीचा दाखला देत ठाणे पोलिसांतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी सकाळी 7 वाजणेच्या सुमारास घडली. मुलगा आणि मुलगी एकत्र फिरत होते. त्यानंतर तो मुलगा तिला ट्रेनच्या शौचालया घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित घटनेबाबत पहिल्यांदा मुंबई शहरातील कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. नंतर ही तक्रार ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक झाली नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.
News English Summary: A girl has been raped in the toilet of a passenger train. The incident took place during the Gorakhpur Express train journey. Taking serious note of the incident, Thane police has registered a case against a 19-year-old youth. The accused youth is accused of raping the victim, Thane police said on Sunday.
News English Title: A girl has been raped in the Gorakhpur Express train toilet news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं