शिरूर | खा. अमोल कोल्हे यांचा विकास कामांचा धडाका | वढु बु. प्रजिमा १९ या रस्त्यासाठी 6.5 कोटी मंजूर

शिरूर, ०३ मार्च: शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिग्गज माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. मात्र त्यांच्या मतदारसंघात आता विकास कामांचा धडाका देखील सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
त्याचाच भाग म्हणजे शिरूर तालुक्यातील वढु बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक बलिदान स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन कोरेगाव भीमा ते वढु बु. प्रजिमा १९ या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार ॲड. अशोक पवार यांच्या मागणीनुसार ‘पीएमआरडीए’ने साडेसहा कोटींच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेनंतर वढु बु. येथील बलिदान स्थळाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या शंभुभक्तांच्या संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा ते वढु बु. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायत वढु बु. आणि शंभुभक्तांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार आणि ‘पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे यांना या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री पवार यांनी निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले होते.
‘पीएमआरडीए’ पहिल्या टप्प्यात प्रजिमा १९ वरील कोरेगाव भीमा ते वढु बु. या ३.२५० कि. मी. लांबीपैकी कि. मी. ००/०० ते कि.मी.९५० या लांबीतील रस्त्याचे १०.००/१२.०० मीटर रुंदीकरण व सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्याच्या कामांसाठी रु. ६५८.२७ लक्ष इतक्या निधीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली. लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
News English Summary: In Shirur Lok Sabha constituency, NCP’s Amol Kolhe defeated Shiv Sena veteran former MP Shivajirao Adlrao and became an MP in the 2019 Lok Sabha elections. However, development work has also started in his constituency.
News English Title: Shirur loksabha constituency development by NCP MP Amol Khole news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं