खा. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

मुंबई, १० मार्च: दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. (A case has also been registered against Dadullah and Nagar Haveli administrator Praful Kheda Patel)
अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहेत. तसेच दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावरही गुन्ह दाखल करण्या आला आहे. डेलकर यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी काल मला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
दरम्यान, मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर घटनास्थळावरून सुसाइड नोट जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये भाजपाच्या काही नेत्यांची नावे असल्याचा दावा करण्यात येत होता. दरम्यान, काल सभागृहामध्ये विरोधक मनसुख हिरेन यांच्या आत्महत्या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.
News English Summary: A case has finally been registered in connection with the suicide of Dadra and Nagar Haveli MP Mohan Delkar. A case has also been registered against Dadullah and Nagar Haveli administrator Praful Kheda Patel, Home Minister Anil Deshmukh said today.
News English Title: A case has also been registered against Dadullah and Nagar Haveli administrator Praful Kheda Patel news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं