जागतिक निद्रा दिन | पेट्रोल-डिझेल, LPG दरवाढ, अर्थव्यवस्था ICU'मध्ये | कुंभकर्ण सरकारला जाग कधी..

सांगली, १९ मार्च: देशाची राजधानी दिल्लीच्या दरवाज्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू, राज्यात महागाई वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहे. याच कारणावरुन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने त्यांनी या विषयांवर केंद्र सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला केव्हा जाग येणार? असे म्हणत जयंत पाटलांनी केंद्रावर निशाणा साधला. तसेच ‘वर्ल्ड स्लीप डे’ असं टॅगही जयंत पाटील यांनी केले आहे. ‘शेतकरी आंदोलनात जवळपास 300 च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’ असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे.
शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत, तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे.
केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?#WorldSleepDay
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) March 19, 2021
19 मार्च हा दिवस वर्ल्ड स्लीप डे म्हणून ओळखला जातो. जयंत पाटील यांनीदेखील आपल्या ट्वीटमध्ये वर्ल्ड स्लीप डे असं टॅग केले आहे. तसेच केंद्र सरकारला देशभरातील महत्त्वाच्या समस्यांची आठवण करुन दिली आहे. पाटलांनी मोदी सरकारला कुंभकर्णाची उपमा देत जाग करण्याचा प्रयत्न केला आहे.
News English Summary: Farmers’ agitation has been going on for the last several days at the gates of the country’s capital Delhi, inflation has risen in the state, petrol and diesel prices have gone up. For this reason, Water Resources Minister Jayant Patil has targeted the Central Government. Today, on the occasion of World Sleep Day, he has tried to wake up the central government on these issues.
News English Title: Minister Jayant Patil criticised Modi govt on World Sleep Day news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं