अंधेरी पूल दुर्घटना: जीवन ज्योत प्रतिष्ठाणचा रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या 'त्या' कामगारांना मदतीचा हात

मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना घडल्यानंतर अनेक कामगार रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी भर पावसात राबताना दिसत आहेत. परंतु त्यात आता माणुसकीच दर्शन घडविणाऱ्या घटना सुद्धा दिसू लागल्या आहेत. भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी मुरजी पटेल यांच्या जीवन ज्योत प्रतिष्ठाण या समाजसेवी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे.
भर पावसात रेल्वेसेवा सुरळीत करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांसाठी जीवन ज्योत प्रतिष्ठाणने खाण्या-पिण्याच्या वस्तू प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पुरविल्या आहेत. दिवसभर मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम असून त्यात भर म्हणजे अनेक व्हीआयपी प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देत असल्यामुळे, प्रत्यक्ष ठिकाणी राबणाऱ्या कामगारांकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. परंतु प्रत्यक्ष घटनास्थळाच्या भेटी दरम्यान भाजपचे नगरसेवक असलेले मुरजी पटेल यांच्या ते निदर्शनास येताच, त्यांनी पुढाकार घेऊन त्या कामगारांना जीवन ज्योत प्रतिष्ठाण तर्फे मोफत खाण्यापिण्याच्या वस्तूंची त्याच ठिकाणी सोया करून दिली, तेव्हा कामगारांचा जीव भांड्यात पडला असं दिसत होत.
दुर्घटना घडली असली तरी सध्या ही वेळ रेल्वेसेवा लवकरात लवकर पूर्ववत कशी करता येईल हे महत्वाचे आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांचा खोळंबा होणार नाही आणि आजचा दिवस जरी मुंबईकरांना खूप दगदगीचा गेला असेल तरी लवकरात लवकर रेल्वेसेवा पूर्ववत कशी करता येईल यावर प्रशासनाचा भर आहे. कारण उद्या मुंबईकर पुन्हा आपल्या दैनंदिन कामासाठी पुन्हा घराबाहेर निघेल आणि त्याआधी रेल्वेसेवा पूर्ववत होणे गरजेचे आहे. अशावेळी जीवन ज्योत प्रतिष्ठाण सारख्या समाजसेवी संस्थेचा खारीचा वाटा सुद्धा महत्वाचा ठरतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं