औरंगाबदमध्ये लाॅकडाऊनचा निर्णय मागे | मात्र रात्रीची संचारबंदी कायम

औरंगाबाद, ३१ मार्च: सामान्य नागरिकांमधून व्यक्त हाेणारा तीव्र राेष, आमदार-खासदार, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून हाेणाऱ्या विराेधापुढे झुकत अखेर जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (३१ मार्च) औरंगाबादेत लागू हाेणारा कडक लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून बुधवारी काढण्यात येणारा माेर्चाही रद्द करण्यात आल्याची घाेषणा पत्रकारांशी बाेलताना केली.
मंगळवारी दुपारी सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधींची बैठक घेऊन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लाॅकडाऊन लावणे कसे गरजेचे आहे ते सांगितले. मात्र या बैठकीतही लाेकप्रतिनिधींनी लाॅकडाऊनला तीव्र विराेधच दर्शवला. तत्पूर्वी छाेटे- माेठे व्यापारी, उद्याेजक व विविध संघटनांनीही विराेधात भूमिका घेतली हाेती. सामान्यांमधूनही प्रशासनाविराेधात प्रचंड राेष वाढत हाेता. खासदार इम्तियाज जलील यांनी तर ३१ मार्च राेजी लाॅकडाऊनविराेधात माेर्चा काढण्याचा इशाराही दिला हाेता. छाेट्या-माेठ्या व्यापाऱ्यांसह २५ हून अधिक संघटनांनी या माेर्चाला पाठिंबा जाहीर करून रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली हाेती. या जनक्षाेभापुढे झुकत प्रशासनाने अखेर लाॅकडाऊनचा निर्णयच रद्द केला.
या आधी औरंगाबादमध्ये ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आजपासुन (३१ मार्च) लॉकडाऊन सुरू होणार असल्यानं गेल्या २ दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र काल (३० मार्च) जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.
रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत असलेली संचारबंदी ‘जैसे थे’ असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे नेहमीसारखे रात्री ८ वाजता दुकाने बंद करावी लागतील.
News English Summary: The district administration finally withdrew its decision to impose a strict lockdown in Aurangabad from Wednesday (March 31) in the face of intense protests from ordinary citizens, MLAs, MPs, traders and various organizations. The decision was announced by District Collector Sunil Chavan at a press conference on Tuesday night. MP Imtiaz Jalil welcomed the administration’s decision and told reporters that the march scheduled for Wednesday had also been canceled.
News English Title: The district administration finally withdrew its decision to impose a strict lockdown in Aurangabad news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं