नोएडा'त मोदींच्या हस्ते होणार सॅमसंगच्या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन

नवी दिल्ली : सॅमसंग कंपनीच्या या प्रकल्पाची बोलणी उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सोबत झाली होती. परंतु उत्तर परदेशात सत्तापालट होऊन भाजपचे सरकार स्थापन झाले आणि सर्व काही खोळंबून होत. परंतु त्यानंतर सॅमसंग’च्या प्रतिनिधींनी उत्तर परदेश दौरा करून विद्यमान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि या प्रकरणाला पुन्हा गती आली आहे.
सॅमसंग’चा हा प्रकल्प तब्बल ५००० कोटी रुपयांचा असून ती त्यांची भारतातील सर्वात मोठी गुंतणूक आहे. या प्रकल्पाची प्रतिवर्षी १२ कोटी मोबाईल उत्पादन करण्याची क्षमता असणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकल्पासाठी सॅमसंग कंपनीला जीएसटी’मध्ये सूट देण्याचे आश्वासन सुद्धा दिले आहे.
येत्या ९ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जेई हे सॅमसंग कंपनीच्या या नव्या प्रकल्पाचे उदघाटन करणार आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पुन्हा रस्ते मार्गाने प्रवास करत हा उदघाटन सोहळा एखाद्या इव्हेन्ट सारखा सादर करणार असल्याचे राजकीय विश्लेषक बोलू लागले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे या गुंतवणुकीमागील प्रयत्नं हे भाजपच्या नव्या सरकारसाठी फलदायी ठरण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं