मागच्यावेळी जिथे खराब रस्ते होते, तिथे चांगले रस्ते झालेले आहेत: आदित्य ठाकरे

मुंबई : मुंबईतील खड्यांची समस्या ही नेहमीचीच झाली असताना त्या संबंधित प्रश्न युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंना प्रसार माध्यमांनी विचारला असता, ‘जर मुंबई शहरातील खड्ड्यांसाठी पालिकेला जबाबदार धरता, तर पालिकेला तसे अधिकार सुद्धा द्या’, असं मत व्यक्त केलं. तसेच आम्ही चांगले दर्जेदार रस्ते येण्याचा प्रयत्नं करत आहोत. मागच्या वेळी जिथे खराब रस्ते होते, तिथे चांगले रस्ते झालेले आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान मुंबईतल्या रस्त्यांच्या कामाचे अधिकार महापालिकेकडे किंवा एखाद्या संयुक्त संस्थेकडे असले पाहिजेत अशी इच्छा सुद्धा व्यक्त केली. मुंबई शहरातील व उपनगरांतून जाणाऱ्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाचाच जर विचार करायचा झाल्यास या मार्गांच्या देखभालीसाठी ४ निरनिराळ्या यंत्रणा असल्याने त्यांच्यात ताळमेळ राहणे खूप कठीण आहे असं त्यांनी सांगितले.
शहरातील विकासकामांसाठी रस्ते खणताना महापालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक करायला हवे आणि एका दिवसांत सर्व खड्डे बुजवले जातील असे मी कधीही म्हणालो नव्हतो असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं