सुप्रीम कोर्ट ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सुनावणी पुढील आठवड्यात घेईल | तोपर्यंत रुग्णांनी श्वास रोखून धरावा - काँग्रेसचं टीकास्त्र

नवी दिल्ली, २३ एप्रिल: देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आणि आवश्यक औषधांची कमतरता लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली आहे. गुरुवारी मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी ही परिस्थिती भयानक असल्याचे सांगितले. केंद्र सरकारकडून त्यांनी 4 विषयांवर राष्ट्रीय आराखडा मागवला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज पार पडणार होती. देशात आणीबाणीसदृश्य परिस्थती निर्माण झाल्याचं काल सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.
CJI एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुरुवारी सांगितले की, ‘कोरोना आणि ऑक्सिजन मुद्द्यावरून दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्य प्रदेश, कलकत्ता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयातील 6 वेगवेगळ्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. याक्षणी ऑक्सिजन यामुळे गोंधळ होऊ शकतो. ‘ खंडपीठाने केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना या विषयावर राष्ट्रीय नियोजन मागितले होते. मात्र आज धक्कादायकरीत्या सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढील आठवड्यात ढकलल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
यावरून काँग्रेसच्या नेत्याने ट्विट करत अप्रत्यक्षरीत्या सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे. काँग्रेस नेते सलमान नाझमी यांनी यासंदर्भात ट्विट करताना म्हटलंय की, “सुप्रीम कोर्ट ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सुनावणी पुढील आठवड्यात घेईल | तोपर्यंत रुग्णांनी श्वास रोखून धरावा किंवा मरा असं उपहासात्मकपणे म्हटलंय.
SC will hear the matter of oxygen shortage next week, till then people can hold their breathe or die!
— Salman Nizami (@SalmanNizami_) April 23, 2021
News English Summary: The Congress leader tweeted indirectly criticizing the Supreme Court. Congress leader Salman Nazmi tweeted, “Supreme Court to hold hearing on oxygen supply next week. Until then, patients should hold their breath or die sarcastically.”
News English Title: Supreme court will hear the matter of oxygen shortage next week till then people can hold their breathe or die said congress leader Salman Nizami news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं