भारताची परिस्थिती दयनीय, जगाने मदत केली पाहिजे - ग्रेटा थनबर्ग

स्टोकहोम, २५ एप्रिल: गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 48 हजार 979 रुग्ण आढळून आले आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत कोरोनापासून मुक्त होणार्यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे.
विशेष म्हणजे सक्रीय रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 803 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात गेल्या 100 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरु असून येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, भारतात सध्या कोरोना महामारीमुळे परिस्थिती बिघडत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वीडन येथील हवामान कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन ट्विट करत भारत देशातील ऑक्सिजन कमरतेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे की, ‘भारत देश सध्या कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतून जात आहे. यामुळे देशात ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आदींची कमतरता भासत आहे. त्यामुळे जगाने पुढाकार घेत कोरोनाच्या लढाईत संघर्ष करणार्या भारत देशाला मदत केली पाहिजे.’ असे आवाहन तीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला केले.
Heartbreaking to follow the recent developments in India. The global community must step up and immediately offer the assistance needed. #CovidIndia https://t.co/OaJVTNXa6R
— Greta Thunberg (@GretaThunberg) April 24, 2021
News English Summary: Heartbreaking to follow the recent developments in India. The global community must step up and immediately offer the assistance needed said Greta Thunberg over India corona pandemic news updates.
News English Title: The global community must step up and immediately offer the assistance needed said Greta Thunberg over India corona pandemic news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं