मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव लोकसभेने फेटाळला

नवी दिल्ली : केंद्रात नरेंद्र मोदी सरकारविरोधात टीडीपी’ने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील लढाई मोदी यांनी शुक्रवारी आणि अपेक्षेप्रमाणे सहज जिंकली आहे. मतदानाच्या आकडेवारीनुसार विरोधकांच्या बाजूने १२६ मतं तर सरकारच्या बाजूने एकूण ३२५ मतं पडली आहेत.
तब्बल १० तास रंगलेल्या चर्चेदरम्यान दोन्ही बाजीने तुंबळ आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना, भाजप आणि आरएसएस वर टीकेची झोड उठवली आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेऊन आमच्या मनात कोणाबद्दलही आकस नसल्याचं दाखवून दिल. त्यामुळे नरेंद्र मोदी काँग्रेसच्या या खेळीला कस उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहील होत.
त्यानंतर नरेंद्र मोदींनी दीड तास विरोधकांना प्रतिउत्तर देत आरोपांना प्रतिआवाहन दिल. सभागृहात त्यावेळी एकूण ५४३ सदस्यांपैकी ५४१ सदस्यच उपस्थित होते. शिवसेना, बीजेडी, टि.आर.एस या पक्षांचे खासदार मतदानास उपस्थित नव्हते. पंतप्रधानांच्या उत्तरानंतर अविश्वास प्रस्ताव मतास टाकण्यात आला असता, विरोधकांच्या बाजूने १२६ मतं तर सरकारच्या बाजूने ३२५ मते पडली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज आता सोमवारी सुरू होईल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं