जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना व उद्योगपतींना मोठ्या मनाने मिठ्या मारल्या: राज ठाकरे

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आलिंगन दिल्याच्या विषयाला अनुसरून ट्विटर द्वारे प्रतिक्रिया नोंदवली आहे. कारण त्या आलिंगनानंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर होकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया सर्वच थरातून नोंदवल्या जात आहेत. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आलिंगन दिल खरं, परंतु मोदींनी उभं राहण्याची तसदी घेतलेली पाहायला मिळाली नाही.
भाषण संपल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या मनात भाजप आणि मोदींबद्दल कोणताही राग व द्वेष नसल्याचे दाखविण्यासाठी भर सभागृहात मोदींना आलिंगन दिले. परंतु त्यावेळी विनंती करून सुद्धा पंतप्रधानांनी उभं राहण्याची तसदी घेतली नाही. परंतु राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींच्या या आलिंगनानंतर त्यांच्यावर अनेक थरातून कौतुक आणि टीका सुद्धा होताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे समाज माध्यमांवर तर #RahulHugsModi हा हॅशटॅग वापरत अनेकांनी या मिठीच्या समर्थनार्थ आणि विरोधात आपली मते नोंदवली आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या विषयाला अनुसरून राज ठाकरे यांनी ट्विटर द्वारे नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला आहे. ट्विट करताना राज ठाकरे म्हटलं आहे की,’जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती? #RahulHugsModi’. राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेवर मोठ्या प्रमाणावर लाईक्स’चा पाऊस पडताना दिसत आहे.
कारण नरेंद्र मोदी अनेक वेळा जगभरातील देशांच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांनी त्या देशातील राष्ट्राध्यक्षांना खुल्या मानाने आलिंगन दिल होत आणि त्यात अगदी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा सुद्धा समावेश होता. मग तीच राजकीय प्रगल्भता राहुल गांधींच्या बाबतीत मोठ्या मनाने का दाखविली गेली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या ट्विट’मध्ये तथ्य असल्याचेच म्हणावं लागेल.
जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना, उद्योगपतींना मिठ्या मारणाऱ्या नरेंद्र मोदींना, राहुल गांधींच्या मिठीचा स्वीकार उमदेपणाने करायला काय हरकत होती? #RahulHugsModi
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2018
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं