धक्कादायक | कर्नाटकातील इस्पितळात २४ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू

बंगळुरू ०३ एप्रिल | भारतामध्ये कोरोनाचा विळखा हा दिवसेंदिवस घट्ट होत असताना दिसत आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये सलग तीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहेत. रविवारी पुन्हा एकदा 3 लाख 50 हजार 598 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3,071 रुग्णांनी जीव गमावला आहे. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 882 राहिली. तर एकूण संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. आज ही संख्या 1.99 कोटींच्या पार पोहोचली आहे.
भारतात व्हायरसचा प्रकोप किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज आपल्याचा ताज्या आकडेवारीवरुन येऊ शकतो. शनिवारी जगाच्या टॉप-50 संक्रमित देशांमध्ये मिळून 3.91 लाख लोक संक्रमित आढळले, तर एकट्या भारतामध्ये 3 लाख 92 हजार 459 रुग्ण आढळले. म्हणजेच 50 देशांमधील एकूण रुग्णांपेक्षा एक हजार जास्त रुग्ण भारतात आढळले.
दुसरीकडे देशभरातील अनेक इस्पितळांमध्ये ऑक्सिजनचा भीषण तुटवडा जाणवत असल्याने इस्पितानाची धाकधूक वाढली आहे. परिणामी आपण त्याला जवाबदार नसून केंद्र सरकार वेळेवर ऑक्सिजन पुरवठा करण्यात असमर्थ ठरत असल्याने अनेक इस्पितळांनी न्यायालयात आधीच याचिका दाखल केला आहेत. मात्र आता कर्नाटकातून एक धक्कादायक वृत्त आलं आहे. त्यानुसार कर्नाटकातील चमराजानगर येथील जिल्हा रुग्णालयात तब्बल २४ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. त्यामुळे इस्पितळाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी उद्या आपत्कालीन बैठक बोलावली आहे.
Karnataka Chief Minister BS Yediyurappa has spoken to Chamarajanagar district collector over the incident and called an emergency Cabinet meeting tomorrow.
— ANI (@ANI) May 3, 2021
News English Summary: In Karnataka 24 patients, including COVID-19 patients, died at Chamarajanagar District Hospital due to oxygen shortage & others reasons in last 24 hours. We are waiting for the death audit report said District Incharge Minister Suresh Kumar news updates.
News English Title: Karnataka 24 patients including COVID 19 patients died at Chamarajanagar District Hospital news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं