पोटात आमच्या पाप नाही अन महाराष्ट्रात मनसेला रोखायची कोणाच्या बापाची टाप नाही: शरद सोनवणे

पुणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील पदाधिकारी मेळाव्या निमित्त मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे सुद्धा मंचावर उपस्थित होते. अनेक दिवसानंतर ते आज मनसेच्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित सुद्धा केलं. त्यांच्या रोखठोक भाषणातून त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा जागविण्याचे काम केले.
उपस्थिता मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आमदार शरद सोनावणे म्हणाले की,’मला कोणी तिकीट देत नव्हतंं तेव्हा मला एका दिलेर माणसाने तिकीट दिले त्यांच नाव आहे राज ठाकरे असल्याच सांगत मी मनसेचा निष्ठावंत असल्याचं सांगत, पोटात आमच्या पाप नाही अन महाराष्ट्रात मनसेला रोखायची कोणाच्या बापाची टाप नाही असा आत्मविश्वास मनसे पदाधिकाऱ्यांना दिला.
युती सरकारच्या ढिसाळ आणि अपेक्षा भंग करणाऱ्या राज्य कारभारामुळे मनसेसाठी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने पोषक आणि आशादायी वातावरण निर्माण होत आहे आणि याचच हे धोतक असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं