मराठा आरक्षण; शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आज स्वतंत्र बैठक

मुंबई : सध्या मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात मराठा क्रांती मोर्चातील आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागतच सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. त्या अनुषंगानेच आज शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने आपापल्या आमदारांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या स्वतंत्र बैठक आयोजित केल्या आहेत.
शिवसेनेच्या आमदारांची बैठक आज मुंबईमध्ये मातोश्रीवर दुपारी १२ वाजता पार पडणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षातील आमदार तसेच खासदारांची मतं जाणून घेणार असून त्यानंतर पक्ष प्रमुख त्यांची मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करतील असं समजतं. तर दुसरीकडे राज्यभर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होत आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात होणार असून, एनसीपी विधीमंडळ पक्षाची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वच पक्ष खडबडून जागे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या वाढत्या दबावापुढे आणि निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करणे महत्वाचे असल्याने सध्या हा बैठकांचा सिलसिला वरचेवर अनुभवायला मिळणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं