आसाम'मध्ये घुसखोरांना दणका मिळणार? तब्बल ४० लाख नागरिक बेकायदा घोषित

नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा जाहीर करताच आसाममध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रचंड वाढ करण्यात आली आहे. राज्यभर सशस्त्र पोलिसांच्या तब्बल २२० कंपन्या तैनात करण्यात आल्या असून बारपेटा, दारंग, दिमा हासौ, सोनितपूर, करीमगंज, गोलघाट, धुबरी या जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्ह्णून पोलीस प्रशासनाने कलम १४४ लागू केलं आहे.
आज आसाममध्ये एनआरसी म्हणजे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा मसुदा जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार आसाममध्ये २ कोटी ८९ लाख ८३ हजार ६७७ लोक कायदेशीर तर तब्बल ४० लाख ७ हजार ७०७ लोकांना थेट बेकायदा घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आसाममध्ये घुसखोरी केलेल्या आणि नागरिकता सिद्ध करू न शकलेल्या त्या ४० लाख लोकांना बेघर व्हावे लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने नजीकच्या काळात आसाम धुमसणार अस म्हटलं जात आहे.
दरम्यान हा मसुदा अंतिम नसून आक्षेप असणाऱ्यांना तक्रार करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच त्यांना पुराव्यासहित नागरिकत्व सिध्द करण्याची संधी देण्यात आली आहे, असं एनआरसीच्या राज्य समन्वयकाने स्पष्ट केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं