महत्वाचं | हॉलमार्किंग १६ जूनपासून सक्ती | तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांचे काय?

नवी दिल्ली, १२ जून | केंद्र सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग १६ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था अनिवार्य करण्यासाठी पूर्वी १५ जानेवारीचा मुहूर्त निघाला होता. मात्र आता एक दिवस आणखी वाढवला आहे. याचाच अर्थ आता दागिण्यांच्या व्यापाऱ्यांना १५ जूननंतर १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दागिणेच विकण्याची परवानगी असेल. बीआयएस एप्रिल २००० पासून सोन्याच्या दागिण्यांसाठी हॉलमार्किंगची योजना राबवत आहे. सध्या जवळपास ४० टक्के दागिण्यांचे हॉलमार्किंग होत आहे.
1. हॉलमार्किंगमुळे कायद्यात ग्राहकांचे हित सुरक्षित राहील. कुठलाच व्यापारी ग्राहकांची फसवणुक करू शकणार नाही आणि सोन्याच्या शुद्धतेवर थर्ड पार्टीची गॅरेंटी असणार आहे.
2. हॉलमार्किंगमुळे घरात ठेवलेल्या सोन्याला काहीच फरक पडणार नाही. ग्राहक जुने दागिणे कधीही विकू शकणार आहे. कारण हॉलमार्किंग ही सोनारांसाठी केलेली अनिवार्यता आहे. त्याला हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही.
3. हॉलमार्क केलेल्या दागिण्यांवर वेगवेगळ्या खुणा असतील. मॅग्नीफायींग ग्लासमधून बघितले तर दागिण्यांवर पाच खुणा दिसतील. यात बीआयएस लोगो, सोन्याची शुद्धता सांगणारा नंबर (२२ कॅरेट किंवा ९१६), हॉलमार्किंग सेंटरचा लोगो, मार्किंगचे वर्ष आणि दागिण्याचे आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे.
4. नोव्हेंबर २०१९ मध्ये सरकारने सोन्याचे दागिणे आणि कलाकृतींवरील हॉलमार्किंग १५ जानेवारी २०२१ पासून अनिवार्य असेल अशी घोषणा केली होती. पण व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर जूनपर्यंत मुदत वाढवून दिली.
हॉलमार्क म्हणजे काय?
सोन्यासाठी हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसद्वारे याची निश्चितता केली जाते. हे सोन्याच्या गुणवत्तेची पातळी तपासते. तसेच दागिने किंवा सोन्याच्या नाण्याच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळांना परवाना दिला जातो. सोने आणि दागिन्यावर बीआयएसची हॉलमार्किंग असणे आवश्यक असते. त्यामुळे सोने खरेदी करताना हॉलमार्क आहे की नाही याची निश्चित चाचपणी करा.
हॉलमार्क कसा ओळखालं?
सोन्याच्या हॉलमार्कमध्ये बीआयएसचे त्रिकोणी चिन्ह असते. तसेच, त्यावर हॉलमार्किंग केंद्राची एक खूण असते. त्यासोबतच सोन्याची शुद्धता, तो सोन्याचा दागिना कधी बनवला आहे, हे देखील त्यावर लिहिलेले असते. सोने आणि दागिन्यावर बीआयएसची हॉलमार्किंग 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यावर केली जाते. हॉलमार्किंगमध्ये चार गोष्टींचा समावेश आहे. ज्यामध्ये बीआयएसचा मार्क, शुद्धता सारखे 22 कॅरेट आणि 916, असेसिंग सेंटरची ओळख आणि सराफांच्या ओळखीचे चिन्ह याचा समावेश असणार आहे.
News Title: You Must know these things about Mandatory Hallmarking Before Buying Gold jewellery news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं