भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार | पण प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही - राष्ट्रवादी

मुंबई, १२ जून | राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.
देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारसाहेबांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली आहे.
मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधी आघाडी तयार करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीत याच मुद्दयावर चर्चा झाल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. ही आघाडी कशी निर्माण करता येईल. त्यात कोणते पक्ष येऊ शकतात, भाजविरोधी भूमिका घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या इतर पक्षाच्या नेत्यांना कसे जवळ आणता येईल, यावरही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. तसेच बसपा नेत्या मायावती, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅनली आणि सपा नेते अखिलेश यादव हे या आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे त्यांना कोणत्या मुद्द्यावर आघाडीत आणता येईल, याचीही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
News Title: Prashant Kishor will not campaign for NCP Party said Minister Nawab Malik news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं