Health First | श्रीखंड खाण्याचे फायदे माहित आहेत का? | वाचा सविस्तर

मुंबई, १२ जून | बहुतेक सर्वांना ताक, दही, लस्सी हे थंड आहेत असेच माहित असते. हो हे सर्वच थंड आहेत पण केवळ स्पर्शाला म्हणजे ?? म्हणजे हे दुधाचे पदार्थ आंबट आहेत, स्पर्शला गार आहेत ( म्हणून पितांना गार वाटतात) पण त्यांचे शरीरातील परिणाम हे उष्ण आहेत. सतत दही, लस्सी आणि तेही उन्हाळ्यात घेण म्हणजे पित्त व रक्ताचे आजारांना तत्काळ आमंत्रणच. म्हणजेच उन्हाळ्यात हे खाण-पिण व तेही भर उन्हात उभे राहून हे जरा रिस्कीच…. नाही का? ज्यांना पूर्वीच पित्ताचे वा रक्ताचे आजार आहेत त्यांनी ह्यांच्या पासून दोनहात लांबच राहिलेले बर. पण, श्रीखंड हा ह्यावर थोडाफार उतारा असू शकतो. ज्यात दह्याचा आंबटपणा व साखरेचा गोडवा देखील आहे.
श्रीखंड दह्याने तयार केलं जातं. यात आढळणारे घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हे प्रो-बायोटिक फूड कॅल्शियमने परिपूर्ण असतं. कॅल्शियमची उपस्थिति दात आणि हाडांना मजबूती देण्याचं काम करते. कॅल्शियमसह श्रीखंडात मिसळले जाणारे ड्राय फ्रूट्स व्हिटॅमिन आणि इतर अनके पोषक तत्त्वांनी भरपूर असतात जे शरीरासाठी आवश्यक आहे. जाणून घ्या याचे फायदे-
इम्यूनिटी वाढते:
श्रीखंड खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. यात आढळणारे गुड बॅक्टेरिया इम्यून सिस्टमला चांगलं ठेवण्यात मदत करतात. सोबतच यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फोरस असतं, जे हाडांच्या मजबुतीसाठी फायद्याचं असतं.
वजन कमी करण्यात फायद्याचं:
दह्यात अधिक प्रमाणात कॅल्शियम आढळतं. हे घटकामुळे शरीर फुलतं नाही आणि वजनावर नियंत्रण राहतं. ड्राय फ्रूट्समुळे प्रोटीन मिळतं जे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. हे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नसल्यामुळे कमी प्रमाणात आहार घेतला जातो.
मूड-स्विंग्स आणि ताण कमी करतं:
दही खाण्याचा थेट संबंध मेंदूशी आहे. दही खाणार्या ताण कमी जाणवतो. श्रीखंडात ते सर्व पदार्थ असतात ज्याने आपलं मूड स्विंग होत असल्यास किंवा गोड खाण्याची इच्छश होत असल्यास फायद्याचं ठरतं. जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर दररोज याचे सेवन करणे फायद्याचं ठरेल. हे शरीराला हायड्रेटेड करुन नवीन ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतं.
News Title: Shrikhand is beneficial for health news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं