कोविड काळात गर्दी होईल म्हणून ते थांबले होते | पण राज ठाकरेंचे झंझावाती दौरे सुरु होतील - बाळ नांदगावकर

मुंबई, १४ जून | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते मुंबईतील लसीकरण उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसे आणि राज ठाकरे यांची पुढील रणनीती सांगितली. आगामी महापालिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचे झंझावाती दौरे सुरु होतील, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
बाळा नांदगावकर म्हणाले, “वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनतेला कशात आनंद आहे ते करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. लसीकरणाचा उपक्रम राबवणाऱ्यांचे स्वागत करतो असं देखील ते म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चिंतन-मनन सुरु असतं, महाराष्ट्रप्रती, लोकांप्रती समस्यांचं चिंतन मनन सुरु आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राची ब्लू प्रिंट 2014 ला अर्पण केली. तब्बल 8 वर्ष अभ्यास करुन त्यांनी महाराष्ट्राप्रती व्हिजन मांडलं. महाराष्ट्राप्रती कोणतीही तडजोड नाही, पक्ष स्थापन केला त्यावेळी त्यांनी स्वत:ला महाराष्ट्राला अर्पण केलं, येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचंड तयारी केली आहे. कोविडमुळे थोडे थांबलेत, ते जिथे जातील तिथे गर्दी होते. त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत. परंतु कोव्हिड काळानंतर त्यांचा झंझावाती दौरा सुरु होईल, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
News Title: MNS chief Raj Thackeray will soon start his political tour over upcoming Municipal election said Bala Nandgaonkar news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं