६ ऑगस्टपासून मनसेकडून मल्टिप्लेक्समध्ये रिअॅलिटी 'कान'चेक होणार

मुंबई : सरकारच्या निर्णयानुसार मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत आणि मल्टिप्लेक्स मालक या नियमाची अंमलबजावणी करत आहेत की नाही याचा मनसे स्वतः ६ ऑगस्टपासून रिअॅलिटी ‘कान’चेक करणार आहे.
केवळ सरकारच्या नियमाची अंमलबजावणी नव्हे तर न्यायालयाने या विषयावर ताशेरे ओढले असताना सुद्धा मल्टिप्लेक्स मालक नियमांची पायमल्ली तर करत नाहीत ना याची खात्री स्वतः मनसे मल्टिप्लेक्समध्ये जाऊन करणार आहे. जर रिअॅलिटी चेक मध्ये काही चुकीचं आढळल्यास तिथेच ‘कान’चेक करण्यात येईल असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी मल्टिप्लेक्स मालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन काही वेळ मागितला होता. त्या प्रमाणे तो पुरेसा वेळ सुद्धा देण्यात आला असून स्वतः सरकारने सुद्धा १ ऑगस्ट पासून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते आणि बाहेरील खाद्य पदार्थ आत मध्ये घेऊन जाण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं