BHR घोटाळा | गिरीश महाजन समर्थकांवर काल कारवाई झाल्यानंतर नाथाभाऊंनी शरद पवारांची भेट घेतली

जळगाव, १८ जून | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुंबई येथे भेट घेतली. जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या समर्थकांवर बीएचआरकडून झालेली कारवाई आणि खडसेंकडून घेण्यात आलेली भेट यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणात सरकारकडून होत असलेली कारवाई योग्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. याप्रकरणी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.
ते आज जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जळगाव बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात होत असलेली कारवाई ही राजकीय हेतूने केली जात आहे, असे नाही. या प्रकरणात कोणाची नावे आहेत, याची मला माहिती नाही. परंतु, या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
गिरीश महाजन काय म्हणाले?
सगळेच माझे निकटवर्तीय आहेत. आमदार चंदू पटेल यांचे नावही त्यात आहे. या सर्वांनी कर्ज फेड केली असल्याचा दावा केला होता आहे. या प्रकरणी कायद्याप्रमाणे कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: NCP leader Eknath Khadse yesterday meet Sharad Pawar after action on BHR scam news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं