राष्ट्रीय पक्षाचा विचार आता जुना झाला | भाजपच्या पराभवासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधावी - महुआ मोइत्रा

कोलकाता, २१ जून | राष्ट्रीय पक्षाचा विचार आता संपुष्टात आला आहे. काळ बदलला आहे. राष्ट्रीय पक्षासोबत लढताना पूर्वी राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची गरज असायची. आता प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाच्या राजकारणाला नवा आकार दिला. बंगालमधील विजयामागे अनेक कारणे आहेत, असे मला वाटते. कोणत्याही लाटेची चिंता न करणारा नेता तृणमूलमध्ये आहे असं तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मत व्यक्त केलं आहे.
प्रादेशिक पक्षाच्या वाढत्या महत्त्वाबद्दल
बंगालच्या निवडणुकीत आम्ही काही गोष्टी दाखवून दिल्या. कोणाचाही लाट असली तरी प्रादेशिक पक्षांना विजयी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही, हे दिसले. राष्ट्रीय पक्षाला दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाने टक्कर देण्याचे दिवस राहिलेले नाहीत. आता भाजपला पराभूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधली पाहिजे. आपापल्या राज्यात लढले पाहिजे. काँग्रेस पुन्हा उभी राहील, असे वाटत असल्यास ३५० जागांवर आणि तेही प्रत्येक राज्यात काँग्रेसचा विजय अशक्य आहे. परंतु बंगालमध्ये तृणमूल, तामिळनाडूत एआयएडीएमके व तीन-चार राज्यांत काँग्रेसच्या असलेल्या ताकदीवरून आता आपल्याला राष्ट्रीय पक्षाची गरज राहिली नसल्याचे स्पष्ट झाले. अर्थात राज्यांद्वारे आता लोकशाहीची अभिव्यक्ती होईल.
पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल
ही गोष्ट मला चुकीची वाटत नाही. भाजपमध्ये ३०-४० वर्षांपासून आहेत. त्यांचा मी सन्मान करते. वेगवेगळी विचारसरणी स्वाभाविक असते. परंतु एकाच विचारसरणीला समर्पित आहोत, असे सांगून अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली जाते ही गोष्ट मला दु:ख देणारी वाटते. जितन प्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे यांची उदाहरणे समोर आहेत. मुकुल रॉय यांना चूक लक्षात आल्याबराेबर ते परतले. आम्ही त्यांचे स्वागत केले. मी देखील १०-११ वर्षांपूर्वी काँग्रेस सोडली होती. कारण मला बंगालमध्ये तळागाळात जाऊन काम करण्याची इच्छा होती. परंतु काँग्रेसमध्ये मला ते शक्य होत नव्हते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: The concept of national party is outdated and regional parties should be formed to defeat BJP said TMC MP Mahua Moitra news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं