मोदी हैं तो मुमकिन हैं | कोंबडीपेक्षा भाज्या झाल्या महाग | महागाई गगनाला भिडली

मुंबई , २१ जून | कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशात एकीकडे बहुतांश लोकांचे उत्पन्न कमी होत होते, तेव्हा दिलासा देण्याऐवजी सरकारने महागड्या पेट्रोल-डिझेलचा बोजा लोकांवर टाकला. परिणामी प्रथमच सरकारची कमाई यंदा प्राप्तिकरांपेक्षा पेट्रोल-डिझेलवर असलेल्या करांतून अधिक झाली. आकडेवारीनुसार, प्राप्तिकराच्या स्वरूपात लोकांनी ४.६९ लाख कोटी भरले, तर पेट्रोल-डिझेलवर एक्साइज आणि व्हॅटच्या स्वरूपात त्यांना ५.२५ लाख काेटी भरावे लागले. दुसरीकडे, कंपन्यांनी या काळात सर्वात कमी ४.५७ लाख कोटी काॅर्पोरेट कर भरला. पेट्रोल-डिझेलवर एक्साइजशिवाय व्हॅट व इतर अर्धा डझन छोटे कर, शुल्क लावले जाते. ते यापेक्षा वेगळे आहेत.
वर्ष २०२०-२१ मध्ये पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीतून सरकारला ५.२५ लाख कोटी कर मिळाला. यात केंद्राच्या एक्साइज ड्यूटीसह राज्यांचा व्हॅट समाविष्ट आहे. व्हॅटचे आकडे फक्त डिसेंबरपर्यंतचे आहेत. म्हणजे मार्च तिमाहीत राज्यांची झालेली कमाई यात समाविष्ट नाही. तर, याच काळात सरकारी तिजोरीत प्राप्तिकर स्वरूपात ४.६९ लाख कोटी आले. तर, कंपन्यांनी कॉर्पाेरेट टॅक्सच्या स्वरूपात ४.५७ लाख कोटी जमा केले.
दुसरीकडे, नागपुरात काही भाज्या चिकनपेक्षाही महाग झाल्या आहेत. नागपुरात सध्या चिकनचा दर 200 रुपये किलो आहे. पण, मेथी, फरसबी, शेवगा, वाल या भाज्या किरकोळ बाजारात 250 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत आवक कमी झाल्याने सध्या नागपूरच्या किरकोळ बाजारात चिकनपेक्षाही भाजीपाला महागल्याची स्थिती आहे. पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झालंय. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या दरात दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झालीये. याचा ग्राहकांच्या बजेटवर मोठा परिणाम होतोय. राज्यभर सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. मुंबईत पुणे, सातारा, दक्षिणेकडील राज्य, नाशिक आणि इतर ठिकाणावरुन भाजीपाल्याची आवक सुरु आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत.
भाज्यांनी शंभरी पार केली आहे. इंधन दरवाढ शंभरी पार केल्यानंतर भाज्याही महाग झाल्या आहेत आणि पावसामुळे आवक पण कमी झाली असल्यामुळे याचा परिणाम गृहींनींच्या बजेटवर झाला आहे. लोकांच्या खिशाला कात्री बसत आहे. तसेच विक्रेत्यांनाही 30 ते 40 टक्के फटका सहन करावा लागत आहे.
* भाज्या दर प्रति किलो
* मेथी 250 रुपये किलो
* फरसबी 250 रुपये किलो
* वाल 250 रुपये किलो
* शेवगा 250 रुपये किलो
* फ्लावर 120 रुपये किलो
* वांगी 80 रुपये किलो
* टोमॅटो 50 रुपये किलो
* कोथिंबीर 120 रुपये किलो
* पत्ताकोबी 80 रुपये किलो
* दोडका 120 रुपये किलो
* भेंडी 120 रुपये किलो
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Vegetable Price Hike Became More Expensive Than Chicken Due news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं