विरोधकांची नव्हे, ती बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची | काँग्रेस-शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही - संजय राऊत

नवी दिल्ली, २२ जून | पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी प्रशांत किशोर यांनी पुन्हा पवारांची भेट घेतली. ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.
दरम्यान, या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे. पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत मीडियाशी बोलत होते. तुम्हाला कुणी सांगितलं ही विरोधी पक्षाची बैठक आहे? या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव कुठे आहेत? त्यांची काय वेगळी तिसरी आघाडी आहे का? असा सवाल करतानाच ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची बैठक आहे. त्यापलिकडे या बैठकीचं महत्त्व वाटत नाही, असं राऊत म्हणाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की पोहचावा.
News Title: Not A third front meet at Sharad Pawar home says SHivsena MP Sanjay Raut news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं