ACB सचिन वांझेची खुली चौकशी करणार | कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्याच्या २ तक्रारी

मुंबई, २५ जून | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर 25 फेब्रुवारी रोजी स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन स्फोटके सापडली होती. यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यास अटक केली होती. या दरम्यान सचिन वाझे याची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान आात राज्याच्या लाचलुचपत विभागाकडून सचिन वाझे याची खुली चौकशी केली जाणार आहे.
देशभरात खळबळ माजवणारा टीआरपी घोटाळ्यासंदर्भात सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याने तपास केला होता. त्या दरम्यान त्याने काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचे समोर आले होते. या संदर्भात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमा होण्याच्या दोन तक्रारी लाचलुचपत विभागाकडे करण्यात आलेल्या होत्या. या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल झालेला जरी नसला तरी मुंबई पोलिसांकडे लाचलुचपत विभागाकडून सचिन वाझे यांची खुली चौकशी करण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे याची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाला कुठल्याही परवानगीची गरज नसल्याचे मुंबई पोलिसांकडून एसीबीला कळवण्यात आलेले आहेत. आता त्यानुसार सचिन वाझे याची खुली चौकशी लाचलुचपत विभागाकडून केली जाणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: State ACB to conduct open inquiry of Sachin Waze in bribe case news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं