Health First | वारंवार शिंका येत असतील तर करा हे उपाय - नक्की वाचा

मुंबई, २९ जून | अधूनमधून कधीतरी शिंका सर्वांनाच येतात. एखाद दुसरी शिंक आली तर त्यात काही वावगं नाही, परंतु जर वारंवार शिंका येऊ लागल्या, किंवा न थांबता सलग शिंका येऊ लागल्या तर मात्र आपण अगदी हैराण होऊन जातो. अशा शिंकांमुळे चिडचिड होऊ लागते. शिवाय सतत शिंका आल्या तर डोकेदुखी सुद्धा उद्भवू शकते.
जर तुम्ही अशा वारंवार शिंका येण्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर खालील उपाय नक्की करून पहा. तुम्हाला ह्याचा नक्कीच उपयोग होईल. आयुर्वेदात सांगीतल्याप्रमाणे शिंका येणे हे एखाद्या आजारचे लक्षण असू शकते. शिंक आली की नाक आणि घश्यातून शरीरातील दूषित द्रव्ये बाहेर टाकली जातात. एखाद्या संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्याची शरीराची ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला जर वारंवार शिंका येत असतील तर त्या व्यक्तिमध्ये रोगप्रतिकार शक्ति कमी असण्याचे हे लक्षंण आहे. म्हणून शिंका येण्याशी संबंधित सर्व माहिती असेल तर आपण ह्या त्रासावर घरगुती उपचार करून मात करू शकतो.
शिंक येते म्हणजे नक्की काय होते?
नाकपुड्यांच्या आतील भाग खूपच संवेदनशील असतो. त्यामुळे बाहेरून कोणत्याही प्रकारचा तीव्र गंध, धूर, धुके अथवा धूळ नाकात शिरली तर अचानक शिंक येते. कारण नाकात काही शिरलं की नाकपुडयाद्वारे तसा संदेश मेंदूला जातो आणि मेंदू नाकाला शिंक येण्याच्या सूचना देतो. त्यामुळे तो पदार्थ नाकपुडयाद्वारे बाहेर टाकला जातो.
शिंक का येते:
१. धूळ, धूर आणि तीव्र गंध ह्यामुळे नाकपुड्यां च्या आतील मांसल भाग उत्तेजित होतो आणि त्यामुळे शिंका येतात.
२. सतत प्रदूषणयुक्त वातावरणात राहिल्यामुळे शिंका येतात.
३. सर्दी झालेली असताना शिंका येतात. कारण सर्दीमुळे नाकाच्या आतील भागाला सूज येते व तेथे हुळहुळून शिंक येते.
४. Allergy असणाऱ्या लोकांना वारंवार शिंका येतात.
५. एखाद्या औषधाच्या रिएक्शन मुळे देखील शिंका येतात.
शिंक येण्याची लक्षणे: जर खालील लक्षणे असतील तर शिंका येण्याचा त्रास होणार हे ओळखावे.
१. डोळे लाल होणे
२. नाकातून पाणी वाहणे
३. नाकात वारंवार खाज येणे
४. डोके जड होणे किंवा दुखणे
५. चिडचिड होणे
६. वास न येणे
शिंका येण्यावर करण्याचे घरगुती उपाय:
* आलं – वारंवार शिंका येत असतील तर आल्याच्या रसात गूळ मिसळून दिवसातून २ वेळा घ्यावा.
* दालचीनी – ग्लाससभर गरम पाण्यात अर्धा चमचा दालचीनी पावडर आणि थोडा मध मिसळून ते प्यावे. ह्यामुळे शिंका येणे कमी होते.
* पुदिना – उकळत्या पाण्यात पुदिना तेलाचे काही थेंब घालून त्या पाण्याची वाफ घ्यावी. ह्यामुळे देखील शिंका येणे कमी होते.
* ओवा – ग्लासभर पाण्यात एक चमचा ओवा घालून ते पाणी उकळून गाळून प्यायले असता शिंक येण्याच्या समस्येवर फायदा होतो.
* हळद – शिंका येण्यावर गरम दुधात हळद घालून घेणे उपयोगी आहे. तसेच रोजच्या जेवणात हळदीचा वापर अवश्य करावा. त्यामुळे शिंका येण्याचे प्रमाण कमी होते.
* निलगिरी तेल – सारख्या शिंका येत असतील तर उकळत्या पाण्यात काही थेंब निलगिरी तेल घालून त्या पाण्याची वाफ घेतली तर फायदा होतो. तसेच नाक चोंदले असेल तर ते ही मोकळे होते.
* लिंबू – एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्यावा. त्यामुळे शिंका येणे कमी होते.
* लसूण – लसणाच्या ३/४ पाकळ्या ठेचून एक ग्लास पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. त्यामुळे देखील शिंक येणे कमी होते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Home remedies on sneezing health article news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं