मराठी कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरण | एकाला अटक, ५ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई, ०४ जुलै | कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर, कलाविश्वासात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सोनाली राजेश साप्ते यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत ही कारवाई केली.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच आरोपींनी कट रचून राजेश साप्ते यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच, लेबरला कामावर येऊ देणार नाही. शिवाय व्यवसायिक नुकसान करण्याची ही धमकी देण्यात आली होती, असं मयत राजेश यांच्या पत्नी सोनाली सापते यांनी फिर्यादीत म्हटलेलं आहे. राजेश यांना दहा लाख रुपये आणि प्रत्येक प्रोजेक्टमागे एक लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. राजेश यांना अडीच लाख रुपये देण्यास भागही पाडलं होतं, असंही तक्रारीत म्हटलेलं आहे.
एकूण ५ आरोपींपैकी चंदन रामकृष्ण ठाकरे याने विश्वासघात करून वेळोवेळी फसवणूक केली असल्याचं त्यांच्या पत्नीनं म्हटलं आहे. पाचही आरोपींच्या जाचाला कंटाळून राजेश साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आल्याचं सोनाली यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नरेश विश्वकर्मा (मिस्त्री) , गंगेश्वर श्रीवास्तव (संजुभाई), राकेश मौर्य, चंदन रामकृष्ण ठाकरे आणि अशोक दुबे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून, चंदन रामकृष्ण ठाकरे याला अटक करण्यात आली आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Pune Art Director Rajesh Sapte Suicide Latest News Pune Police Fir Registered One Arrested news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं