केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा

आसाम : पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार आसाम मधल्या नगांव जिल्ह्यात हा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर महिलेला त्यांची ओळख पटली असून गोहेन यांचं त्या महिलेकडे जाणं येणं होतं असं त्या महिलेचं म्हणणं आहे. पोलिसांकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्या नुसार याची नोंद ८ महिन्यांपूर्वीच करण्यात आली आहे.
नगांव’चे पोलीस उपाधीक्षक संबिता दास यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेने ही तक्रार केल्यानंतर पोलीसांनी 2 ऑगस्टला रोजी गुन्हा नोंदवून घेतला होता. पोलीस नोंदणीनुसार त्या महिलेचा तक्रार क्रमांक २५९२-१८ असा आहे. भारतीय दंड संहितेनुसार कलम ४१७ म्हणजे फसवणूकीचा, ३७६ बलात्काराचा तसेच ५०६ म्हणजे धमकी देणं ही कलमं गोहेन यांच्यावर लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
सदर तक्रारदार महिलेने वैद्यकीय तपासणीस नकार दिला असून पुढे त्या महिलेने असं स्पष्ट केलं की ही घटना घडली तेव्हा त्या महिलेच्या घरी तीचे कुटूंबिय आणि पती घरी नव्हते अशी माहिती पोलीसांनी दिली. परंतु एका केंद्रीय मंत्र्यांवर बलात्काराचा गुन्हा नोंदविला गेल्याने खळबळ माजली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं